बिग बॉस

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 ची पहिली फायनलिस्ट ठरली! ग्रँड फिनालेमध्ये केली निक्कीने पहिली एंट्री

Published by : Team Lokshahi

बिग बॉसचा क्रेज संपूर्ण जगभरात पाहायला मिळतो. हिंदी बिग बॉस असो किंवा मराठी बिग बॉस पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी सज्ज असतात. टीव्हीवर पाहिला जाणारा बिग बॉस आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. तर मराठी बिग बॉस सिजन 5 चा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. कदाचित हे सगळ आत असलेल्या सदस्यांमुळे देखील असू शकतं. बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सिजनमध्ये बिग बॉस सिजन 5 चा टीआरपी आणि चाहतावर्ग हा खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे.

बिग बॉसचा फॅनबेस आता संपुर्ण राज्य भरातच नाही तर संपूर्ण जग भरात पाहायला मिळत आहे. बिग बॉस आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर अंतिम टप्प्यात असताना बिग बॉस मराठी 5 मध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अशातच बिग बॉस मराठी 5 चा पहिला सदस्य ग्रँड फिनालेमध्ये आपली जागा बनवून सेफ झाला आहे. बिग बॉस मराठी 5 ची पहिली फायनलिस्ट ठरली आहे निक्की तांबोळी, निक्कीने दमदारपणे ग्रँड फिनालेमध्ये आपली जागा बनवली आहे. तिच्यासोबत तिकीट टू फिनालेसाठी सुरज तिच्या समोर उभा होता. म्युचअल फंडमध्ये सर्वाधिक रक्कम निक्कीची होती त्यामुळे ती थेट तिकीट टू फिनालेची उमेदवार ठरली.

तर झेंडाच्या टास्कमध्ये सूरजने देखील दणदणीत विजय मिळवला त्यामुळे तो दुसरा उमेदवार ठरला. यानंतर या दोघांमध्ये टास्क ठेवण्यात आलं ज्यामध्ये दोघांसाठी गार्डन एरियामध्ये लोखंडच्या पाईपचे एक चक्रव्युह ठेवण्यात आलं होते आणि त्यात एक रिंग अडकवण्यात आली होती. स्पर्धकांना चक्रव्युहातली रिंग बजर वाजल्यानंतर रिंगचा त्या चक्रव्युहाला स्पर्श होऊ न देता स्टार्ट पॉईंटपासून ते एंड पॉईंटपर्यंत घेऊन जायची होती. या टास्कमध्ये निक्कीने बाजी मारली आणि तिकीट टू फिनाले पटकावलं.

Shivneri Sundari : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

Nitesh Rane ; 'इम्तियाझ जलील यांना अटक करा' शंभुभक्तांच्या मागणीला नितेश राणेंचा पाठिंबा

Navratri 2024: नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण का केले जाते? जाणून घ्या...

Navratri 2024: नवरात्रोत्सवनिमित्त 'सती' या देवीची जाणून घ्या महत्त्वपूर्ण कथा

Paithan: पैठण येथे श्रीराम कथेची सांगता; भुमरे परिवाराच्या उपस्थितीत राम कथेची सांगता